Home Suicide News संगमनेरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangulation of a youth in Sangamner

संगमनेर | Suicide: संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातूनमंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर तरुणाचे वडील गणेश मच्छिंद्र वाडेकर हे नगरपालिकेत मार्केट यार्ड येथे पाण्याच्या टाकीवर वोलमन म्हणून काम करीत होते. या ठिकाणी असलेले सह कर्मचारी व पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांचा त्रास असल्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप वाडेकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या अर्जात दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात केल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या का केली यामागचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस करीत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Suicide by strangulation of a youth in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here