धक्कादायक! 23 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
कमी उंचीचा सतत विचार करुन तणावाखाली गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमी उंचीचा सतत विचार करुन तणावाखाली गेलेल्या एका 23 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. सोमवारी (4 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. अर्चना विजयकुमार यादव (वय 23 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. प्राथमिक तपासात या तरुणीने उंचीच्या तणावातूनच हे पाऊल उचलल्याचा अंदाज कुटुंबाने पोलिसांकडे व्यक्त केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मूळ उत्तर प्रदेशचे असलेले यादव कुटुंब 20 वर्षांपासून औरंगाबाद शहरातील साताऱ्यात स्थायिक आहेत. तर, अर्चनाचे वडील विजयकुमार यांचा फरशीचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. सोमवारी अर्चना आईसोबत घरीच होती. रात्री आठ वाजता अर्चना खोलीत गेली. साडेआठ वाजण्याच्या सुमारास आईने हाका मारुनही खोलीतून प्रतिसाद येत नसल्याने आईने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा अर्चना गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अंमलदार विष्णू जगदाळे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्चनाचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.
Web Title: Suicide Case step taken by the 23-year-old girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App