Home पुणे 17 वर्षीय मुलाची आत्महत्या

17 वर्षीय मुलाची आत्महत्या

Breaking News | Shirur Suicide: मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या.

Suicide of 17-year-old boy

शिरुर: शिरूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुर शहरातील बाबूरावनगर येथील रतन बुधे ढोली (वय 17 वर्ष) या मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश बुधे ढोली (वय 30) वर्ष रा . पाचर्णे मळा, शिरूर यांनी पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. गणेश ढोली पाचर्णे मळा येथील त्यांच्या घरी असताना त्यांना छोटा भाऊ लक्ष्मण याने फोन केला व सांगितले की, रतन बुधे ढोली (वय 17 वर्षे) याने आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये फाशी घेतली आहे.

त्यानंतर गणेश हे बाबूराव नगर येथे आले असता त्यांचा भाऊ राहत असलेल्या पत्रा शेड समोर त्यांचे नातेवाईक जमा झालेले दिसले. व भाऊ रतन बुधे ढोली हा खाली झोपलेला दिसला तेव्हा त्यांना समजले की, त्यांचा भाऊ रतन बुधे ढोली याने राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीचे सहाय्याने फाशी घेतली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक टेंगले अधिक तपास करत आहेत.

Web Title: Suicide of 17-year-old boy

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here