अहमदनगर: विषारी औषध घेऊन विवाहितेची आत्महत्या
Ahmednagar News | Rahuri: विवाहित महिलेने पती, सासू यांच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना.
राहुरी : तालुक्यातील बाभूळगाव येथे विवाहित महिलेने पती, सासू यांच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. महिला जयश्री संदीप पाटोळे (वय ३५) यांनी असे तिचे नाव आहे. तिच्यावर उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली.
याबाबत मंगळवारी पोलिस ठाण्यात भाऊ आदिनाथ जगन्नाथ वाकडे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) यांनी तक्रार दाखल केली. २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता जयश्री पाटोळे यांचा चुलत दीर हरिभाऊ पाटोळे याने वाकडे यांच्याशी संपर्क साधत तुमची बहीण अत्यवस्थ अवस्थेत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. तिथे २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समजले. याप्रकरणी पती संदीप पोपट पाटोळे व सासू कौसाबाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Suicide of a married woman by taking poisonous medicine
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App