Home जालना दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या, नदीवरील बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या, नदीवरील बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या

एका 30 वर्षीय  महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of a mother with two small children

जालना:  जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर  आली आहे. एका 30 वर्षीय  महिलेने दोन मुलींसह दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी (26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शारदा शरद घनघाव (30), दर्शना शरद घनघाव (4) व हर्षता शरद घनघाव (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी  की, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथे शनिवारी सकाळपासून वीज नसल्याने गावातील विष्णू साहेबराव घनघान लाईनमन व काही ग्रामस्थांसोबत गावाकडील विद्युत ट्रॉन्सफार्मरकडे जात होते. त्यावेळी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत त्यांनी बदनापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, उपनिरीक्षक शेळके है कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कोल्हापुरी बंधाऱ्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

या प्रकरणी विष्णू घनघाव यांच्या माहितीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा मृत शारदा घनघाव यांच्या आसरखेडा येथील माहेरकडील नातेवाईक बदनापूर ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्यात आले. आपल्या मुलींसह नातींचा घातपात झाला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत बदनापूर ग्रामीण रुग्णालयात हजर होते. या प्रकरणी  पुढील  तपास उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

Web Title: Suicide of a mother with two small children

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here