एकोणीस वर्षीय प्रेमीयुगुलाची आत्महत्या
Breaking News | Shirur Suicide: तरुण प्रेमीयुगुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
शिरूर : तरुण प्रेमीयुगुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर येथे घडली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
गणेश सखाराम कुडले (वय १९, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) व अनिषा संजय चांदेकर (वय १९, रा. अंडल, ता. मावळ, जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सखाराम श्रीपती कुडले (वय १९, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. करंजेनगरमध्ये राहणारे सखाराम कुडले हे गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत त्यांचा मुलगा गणेश कुडले हा त्याची प्रेयसी अनिषा चांदेकर हिला घरी घेऊन आला होता. ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास सखाराम हे गावाकडून शिक्रापूर येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून गणेशकडे फोन देण्यास सांगितले. शेजारील व्यक्ती कुडले यांच्या घरात गेले असता यांना गणेश व त्याच्या प्रेयसीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
याबाबतची माहिती मिळताच पोलीस नाईक अतुल पखाले, विशाल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांना घटनास्थळावर एक चिठ्ठी मिळून आली. ‘आम्ही आमच्या स्वेच्छेने करत असून यात आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, आमच्यामुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना त्रास होणार नाही’ असा मजकूर चिठ्ठीत लिहिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.
Web Title: Suicide of a nineteen-year-old couple
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study