Home संगमनेर संगमनेर: जंगलात तरुणाची आत्महत्या, विद्यार्थिनीची छेडछाड, तु माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको

संगमनेर: जंगलात तरुणाची आत्महत्या, विद्यार्थिनीची छेडछाड, तु माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको

Sangamner News:  आरोपामुळे बदनामीच्या भीतीने तरुणाने मालदाड येथील जंगलात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of a young man in the forest, molestation of a student

संगमनेर: छेडछाडच्या झालेल्या आरोपामुळे बदनामीच्या भीतीने तरुणाने मालदाड येथील जंगलात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्याच नात्यातील असणाऱ्या ११ वी च्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची एका तरुणाने छेडछाड केली होती. तु मला फार आवडते माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको असे म्हणून सदर तरुण त्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे या मुलीने ज्या तरुणावर गुन्हा दाखल केला होता. त्या तरुणाने स्वतःची झालेल्या बदनामीमुळे आज सकाळी (दि. १३) मालदाड येथील जंगलात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

विजय रावसाहेब कुटे (रा. सुकेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की,  बुधवार दि. ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास संगमनेर शहरातील सुकेवाडी परिसरात मयत विजय कुटे हा छेडछाड झालेल्या पीडितेच्या जवळचा पाहुणा होता. जवळचा म्हणून पिडीतेने त्याची समज देखील काढली होती. मात्र तो थांबला नाही. बुधवारी त्याने पीडितेला आडवून थेट तिची ओढणी ओढली. त्यानंतर मात्र तीने विजय रावसाहेब फुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दाखल झालेल्या फिर्यादीनुसार सुकेवाडी परिसरातून एक अल्पवयीन विद्यार्थिनी एका कॉलेजात ११ यी च्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी येते होती. दरम्यान तिच्या पाठोपाठ विजय कुटे हा लग्न झालेला तरूण नेहमी तीच्या मागेमागे येत होता. या मुलीचा रस्ता आडविणे तु मला आवडते तु माझ्यासोबत बोल, माझ्यावर प्रेम कर, माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको असे म्हणून तीला त्रास देत होता. नात्यातील असल्याने सुरवातीला तीने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र बुधवारी घडलेल्या प्रसंगानंतर तीने शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याने. याबाबतची माहिती माध्यमांमध्ये य समाजात पसरल्याने आपली मोठी बदनामी झाली आहे. अशी भावना मयत विजय कुटे याच्यात निर्माण झाली. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आज सकाळी आपल्या गाडीवरून जात मालदाड शिवारातील एका जंगलात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने सुकेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहे.

Web Title: Suicide of a young man in the forest, molestation of a student

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here