तरुण शिक्षकाची आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!
Beed Crime: आश्रम शाळेवर कार्यरत असणाऱ्या एका पस्तीस वर्षीय शिक्षकाने जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
बीड : आश्रम शाळेवर कार्यरत असणाऱ्या एका पस्तीस वर्षीय शिक्षकाने जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बीड तालुक्यातील अंतरवणपिंप्री येथे उघडकीस आली.
अंकुश रामभाऊ पवार (रा. अंतरवणपिंप्री) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्या केल्याची माहिती समजताच नागरिकांनी याची पोलिसांना याची माहिती दिली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मयत अंकुश यांनी एक चिट्टी लिहून ठेवलेली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
काय आहे चिठ्ठीत : अंकुश पवार यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकुर असा आहे की, मी अंकुश रामभाऊ पवार, मी अमित अनवणे व कोमल अनिल अनवणे व त्यांच्या भावाने म्हणजे दत्ता गायकवाड, आकाश गायकवाड व त्याची आई या सर्वांनी मिळून १० लाख रुपायांची मागणी केली, त्यांना मी पाच लाख रुपये दिले, तरीही ते मला सतत ब्लॅकमेल करू लागले. मला व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊ लागले. त्यांच्या जाचास कंटाळून मी आत्मत्या करत आहे. ते आत्महत्येस कारणीभूत आहेत. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोनि विश्वास पाटील यांनी दिली.
Web Title: Suicide of a young teacher, shocking revelation in the letter
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App