Home महाराष्ट्र तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking news | Suicide: तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या.

Suicide of a young woman by hanging

हिंगोली | औंढा नागनाथ : तालुक्यातील दुधाळा येथील १९ वर्षीय तरुणीने शेताच्या आखाड्यावर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. घरातील व्यक्ती शेती कामात व्यस्त आहेत. याचदरम्यान तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना तालुक्यातील पिंपळा शिवारात घडली.

दुधाळा येथील दत्तराव आगाशे हे गावाजवळ असलेल्या पिंपळा शिवारात बटईने केलेल्या शेतात आखाड्यावर कुटुंबासहित वास्तव्यास होते. २१ सप्टेंबर रोजी कुटुंबातील व्यक्ती शेतामधील दैनंदिन कामात व्यस्त होते. तर बी. ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली १९ वर्षीय मुलगी आखाड्यावरच अभ्यास करीत थांबली होती.

दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घरातील इतर सदस्य घरी आले असता तरुणीने स्वतःच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून तपास पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title: Suicide of a young woman by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here