Home अहमदनगर बलात्कार केल्याच्या मानसिक त्रासातून तरुणीची आत्महत्या

बलात्कार केल्याच्या मानसिक त्रासातून तरुणीची आत्महत्या

Suicide of a young woman due to mental trauma of rape

अहमदनगर | Rape and Suicide: बलात्कार झालेल्या एका १७ वर्षीय तरुणीने मानसिक त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर शहरातील बोल्हेगाव परिसरात घडली आहे.

यबाबत पिडीत तरुणीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोल्हेगाव परिसरात एक १७ वर्षीय तरुणी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. या तरुणीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. त्यामुळे ही सदर तरुणी गर्भवती राहिली होती. ती गर्भवती असल्याने या तरुणीला धक्का बसला आणि याच मानसिक त्रासातून तिने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.   

Web Title: Suicide of a young woman due to mental trauma of rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here