Home अकोले अकोले: व्यावसायिकाची आत्महत्या,  शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा

अकोले: व्यावसायिकाची आत्महत्या,  शिवसेना शहरप्रमुखावर गुन्हा

Akole Crime News:  सुतारकाम व्यावसायिक यांनी रविवारी सकाळी आपल्या गळ्यात  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of businessman, crime against Shiv Sena city chief

अकोले : शहरातील सुतारकाम व्यावसायिक यांनी रविवारी सकाळी आपल्या गळ्यात  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी वय ६० असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून  त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहरातील शिवसेना ( शिंदेगट) शहर प्रमुखावर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, ती पोलिसांकडे असल्याचे समजते. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत शिवसेना ( शिंदेगट) शहर प्रमुख गणेश कानवडे यांचे नाव असल्याने त्यांच्यावर अत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमोल राजेंद्र सूर्यवंशी(रा. अकोल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादीचे वडील मयत राजेंद्र रघुनाथ सूर्यवंशी यांना गणेश भागुजी कानवडे यांनी वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने फिर्यादीच्या वडिलांनी रविवारी (दि. १५) सकाळी ८.३० वाजण्याच्या पूर्वी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून राहत्या घरात  नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक  तपास पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण हांडोरे करत आहेत.

Web Title: Suicide of businessman, crime against Shiv Sena city chief

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here