Home क्रीडा Super Smash फायनल मधील खेळी आयपीएल लिलावात येणार का कामी ?

Super Smash फायनल मधील खेळी आयपीएल लिलावात येणार का कामी ?

Super Smash Final

Super Smash Final (Santosh Diwadkar) : ऑस्ट्रेलियाच्या BBL पाठोपाठ न्यूझीलंडच्या Super Smash स्पर्धेचा शेवट आज झाला. त्यामुळे दोन्ही स्पर्धेतील खेळाडूंच्या नजरा आता IPL Mega Auction वर खिळल्या आहेत. फायनल मध्ये तुफान उठवलेला मिचेल सेंटनर (Mitchel Santner) किती भाव खाऊन जातो हे देखील लिलावात समजणार आहे.

आज सकाळी Northern Brave आणि Canterbury यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत ब्रेव्ह संघाने विजय मिळवून जेतेपद पटकावले. ब्रेव्ह संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 217 धावा केल्या. यात कटेन क्लार्कने 71 तर मिचेल सेंटनरने नाबाद 92 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना हेन्री शिपलीने सर्वाधिक 3 बळी तर ईडी नुटल आणि टॉड एस्टलने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना ब्रेव्ह कडून भेदक गोलंदाजीचा मारा झाला. केंटरबरी कडून मेट हेन्रीच्या 44 धावांशिवाय इतर कुणालाही धावा काढता आल्या नाहीत. ब्रेव्हकडून टीम साउथी आणि ईश सोधीने 3 गडी बाद केले तर जोए वॉकरने दोन गडी बाद केले. त्याचबरोबर बाकीच्या गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करीत फलंदाजी संघाला 161 धावांवर सर्व बाद केले. आणि नॉर्थर्ण ब्रेव्ह संघाने चषक पटकावला.

जगातील प्रत्येक देशाच्या टी-20 स्पर्धा संपत आल्या असून आता सर्वांचे लक्ष्य आयपीएल लिलावावर लागले आहे. अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मिचेल सेंटनरने आयपीएल लिलावासाठी आपली बेस प्राईज 1 कोटी इतकी ठेवली आहे. मात्र त्याच्या अष्टपैलू कामगिरी आणि सध्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला कोणता संघ किती रुपयांत घेतो याकडे आता तो लक्ष ठेऊन आहे. 2019-20 या दोन सिजनमध्ये तो चेन्नईकडून खेळला होता. आयपीएल मधील 6 सामन्यांत त्याने 6 विकेट्स नावावर केले आहेत.

Web Title : Super smash players focus on IPL auction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here