Home क्राईम नवऱ्याला कामावरून काढेल धमकी देत सुपरवायझरचा महिलेवर बलात्कार

नवऱ्याला कामावरून काढेल धमकी देत सुपरवायझरचा महिलेवर बलात्कार

Pune Crime: नवऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना.

Supervisor rape Woman while threatening to fire Her husband

पुणे: नवऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अंकुश मन्नू राठोड (रा. जळकोट रामतीर्थ तांडा, उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सदर प्रकार २०१७ ते २०१८ दरम्यान आणि ९ नोव्हेंबर रोजी घडला, असे ३५ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती लोहारा येथील लोकमंगल कारखान्यात कामाला आहेत. तर आरोपी हा महिलेच्या पतीचा सुपरवायझर आहे. त्याने पतीला कामावरून काढून टाकण्याची व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेला हाताने मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सततच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी (दि. ५) लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

Web Title: Supervisor rape Woman while threatening to fire Her husband

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here