Home अकोले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या वतीने सायकलींचा आधार

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या वतीने सायकलींचा आधार

Lions Club: ७५ सायकलींचे वाटप करण्यात आले.

Support of bicycles to rural students on behalf of Lions Club

राजूर: सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पायपीट करत अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिरातील ७५ मुलामुलींना मिळाला लायन्स क्लब पुणे फुच्यर आणि तळेगाव लायन्स क्लबच्या सायकलींचा आधार मिळाला.

शुक्रवारी खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिरातील ७५ मुलामुलींना  लायन्स क्लब ऑफ पुणे फुच्यर आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या पदाधिकारी आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत ७५ सायकलींचे वाटप करण्यात आले. लायन अशोक मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयात एकदरे, बाभूळवंडी ,कोंभाळणे आदी परिसरातून अनेक मुले मुली वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने पायपीट करत शाळेत येत असतात.या मुलामुलींचा येण्याजण्याचा वेळ आणि श्रम  वाचावेत हा उदात्त हेतू ठेवत लायन्स क्लबच्या या सदस्यांनी रक्कम एकत्र करत नवीन सायकली घेत या मुलामुलींना स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने भेट दिल्या.

यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, रोहिणी नागवणकर, सुनील ओक, मेघा अंबवले, दिलीप अंबवले, प्रमिला वाळुंज, सुनील वाळुंज, नंदकुमार काळोखे, प्रकाश पटेल, डॉ सचिन पवार, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक नंदकिशोर बेल्हेकर, रामजी काठे, विजय पवार, राम पन्हाळे, व्यवस्थापक प्रकाश महाले, दिनेश शहा, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते

लायन्स क्लब विषयी बोलताना लायन अशोक मिस्त्री म्हणाले ज्या समाजाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी लायन्स क्लब नेहमीच प्रयत्न करत असतो. ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे लक्षात घेत विविध सामाजिक उपक्रम राबवत यातून उतराई होण्याचे काम लायन्स क्लब करत असल्याचे लायन मिस्त्री यांनी सांगितले. सत्यनिकेतन संस्था पदाधिकारी आणि कोषाध्यक्ष विवेक मदन यांनी मला संस्थेत काम करण्याची संधी दिली आणि या संस्थेत काम करत असताना आपल्या आयुष्याची दिशा बदलल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आम्ही ग्रामीण भागातील मुलामुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकली उपलब्ध करून देण्याचे भाग्य आम्हाला मिळाले याचा आम्हा सर्वांना आनंद झाल्याचे प्रतिपादन लायन्स क्लबच्या अध्यक्षा वृषाली गानू यांनी केले.  

संस्थेचे सचिव कानवडे म्हणाले की, लायन्स आणि सत्यनिकेतन यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. या  खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयात बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय झाली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लायन डॉ शाळीग्राम भंडारी म्हणाले आयुष्यात खूप उंच उडी घेत आपले ध्येय साध्य करा.  मात्र हे उद्दिष्ट साध्य करताना ज्या मातीवर आपण बसलो आहोत त्या मातीवर आपले पाय कायम ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.

या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील मुलामुलींना ढोल ताशांच्या गजरात लेझीम, टिपरी नृत्य सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन अध्यापक दिपक पाचपुते यांनी केले. प्रास्तविक तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी केले तर आभार प्राचार्य एल. पी. पर्बत यांनी मानले.

Web Title: Support of bicycles to rural students on behalf of Lions Club

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here