पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोरातील कठोर कारवाई करावी- आ. खताळ
Sangamner News: प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमे लावून तात्काळ गुन्हे दाखल करावे अन सर्व हल्लेखोरांना अटक करत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी.
संगमनेर: शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती समाज माध्यमाच्याद्वारे संगमनेरमध्ये पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते व नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
संगमनेरला विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शहर अशांत करण्याचे काही जण काम करत आहे अशांचा शोध घेऊन त्यांना वेळीच रोखा तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याला चुकी च्या पद्धतीने खतपाणी घालून काहीजण त्या घटनांना राजकीय वळण देत दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे अशांना जर पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल तर संघर्ष करण्यासाठी पहिल्यांदा तुमचा आमदार उपस्थित राहील या हल्या प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कलमे लावून तात्काळ गुन्हे दाखल करावे अन सर्व हल्लेखोरांना अटक करत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी सक्त ताकीद आ अमोल खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे.
Web Title: take strict action against the attackers. Amol Khatal
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News