Breaking News | Shirur Crime: युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर.
शिरूरः तरडोबाचीवाडी, शिरूर येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका तरूणावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलेगाव ता. शिरुर येथील युवतीला रात्रीच्या सुमारास पराग बोटकर या युवकाने तर्डोबाची वाडी येथील एका मंदिराजवळील शेतामध्ये घेऊन जात, युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. मात्र, घाबरलेल्या युवतीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगत थेट शिरुर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पराग ज्ञानेश्वर बोटकर, वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.
Web Title: Taking the girl to the farm and abused her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News