Home नाशिक सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेणारा तलाठी जाळ्यात

Breaking News | Nashik Bribe Case: सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेताना तलाठी लाचलुपपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Talathi, who takes bribe to get name on Satbara, in net

चांदवड : सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना तालुक्यातील कुंदलगाव तलाठी विजय राजेंद्र जाधव यास लाचलुपपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजाराची लाच स्विकारली. तक्रारदाराच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशींनी कुंदलगाव येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.

कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव येथील गट नंबर ४१०, ४१२, ४१४ या गटातील ५०-५० गुंठे जमिनीवर तक्रारदाराची आई, मामा व इतर नातेवाईकांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी चांदवड तहसिलदारांकडे अर्ज केला होता.

अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठ्याकडे देण्यात आला होता. या कामासाठी संशयित तलाठ्याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाच स्वीकारतांना त्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्‍वजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.

Web Title: Talathi, who takes bribe to get name on Satbara, in net

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here