Home क्राईम धक्कादायक! चारित्र्याबद्दल बोलला, महिलेसह साथीदाराने जीवच घेतला

धक्कादायक! चारित्र्याबद्दल बोलला, महिलेसह साथीदाराने जीवच घेतला

Nagpur Crime: चारित्र्याबाबत अपशब्द काढल्याने झालेल्या वादातून एका महिलेने तिच्या सहकाऱ्याच्या मदतीने एका मजुराची हत्या (Murder).

Talked about character, the woman along with the accomplice took Murder

नागपूर: चारित्र्याबाबत अपशब्द काढल्याने झालेल्या वादातून एका महिलेने तिच्या सहकाऱ्याच्या मदतीने एका मजुराची हत्या केली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आरोपी व मृत हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महेश उईके (४०) असे मृताचे नाव आहे. तर राजकुमारी (३५) व करण उईके (४५) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी व मृत हे नारा परिसरात राहायचे. शनिवारी रात्री तिघेही झोपडीसमोरील मोकळ्या जागेत दारू पीत बसले होते. दरम्यान, महेश याने राजकुमारीच्या चारित्र्याबाबत अपशब्द काढले. यावरून झालेल्या वादातून ही घटना झाली.

Web Title: Talked about character, the woman along with the accomplice took Murder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here