Home क्राईम सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात

सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात

Sinnar Crime:  सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना.

Taluka Agriculture Officer of Sinnar nabbed while accepting bribe of Rs 50,000

सिन्नर: सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गेल्या महिनाभरात सहकार विभागातील दोन अधिकारी आणि त्यानंतर आता तालुका कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने शासकीय कार्यालयातील लाचखोरीचा विषय चर्चेचा ठरला आहे.

अण्णासाहेब हेमंत गांगरे (42, रा. प्राइड ग्लोरी अपार्टेट, नाशिक रोड, नाशिक) असे संशयित आरोपी तालुका कृषी अधिकारीचे नाव असून त्यांच्याकडे निफाडचा देखील अतिरिक्त पदभार आहे.

तक्रारदार है सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित कैलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्र ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता ४ लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २ लाख रुपये लाच घेण्याचे निश्चित केले. त्यातील लाचेचा पहिला हफ्ता रु ५०,०००/- पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलीस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली.

Web Title: Taluka Agriculture Officer of Sinnar nabbed while accepting bribe of Rs 50,000

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here