Home अहिल्यानगर ३० हजार रुपयांची लाच घेताना शिक्षकाला रंगेहात पकडले

३० हजार रुपयांची लाच घेताना शिक्षकाला रंगेहात पकडले

Breaking News | Ahilyanagar Bribe: पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन मिळून देण्यासाठी दोन लाख घेऊन आणखी ३० हजारांची लाच घेताना एका शिक्षकाला रविवारी रंगेहात पकडण्यात आले.

Teacher caught red-handed while accepting a bribe

अहिल्यानगर : पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी आणि अटकपूर्व जामीन मिळून देण्यासाठी दोन लाख घेऊन आणखी ३० हजारांची लाच घेताना एका शिक्षकाला रविवारी रंगेहात पकडण्यात आले. विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे.

४ एप्रिलला पाथर्डी पोलिसांनी तक्रारदाराची टपरी व्यवसायासाठी लागत असलेली सुगंधी तंबाखू, सुपारी व मावा घराच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमधून साहित्य जप्त केले होते. ही कारवाई सुरू असताना तक्रारदाराला एका ओळखीच्या व्यक्तीने विजय गर्जे यांना भेटण्यास सांगितले. गर्जे यांनी तक्रारदाराला तुझ्या भावावर मोठ्या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करायचा नसेल आणि तुला तपासात मदत हवी असेल तर तुला सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यानंतर तक्रारदारांनी गर्जे यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने ५० हजार रुपये व नातेवाईकांच्या अकौंटवरून एक लाख रुपये असे दीड लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर १५ एप्रिलला तक्रारदाराने गर्जे यांना फोन करून भावाच्या अटकपूर्व जामीन संबंधित विचारले असता त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकाला उर्वरित पन्नास हजार रुपये देऊन टाका व विषय मिटवून टाका, असे म्हटले. पैसे नाही दिले तर पोलिस तुझ्या भावाला अटकपूर्व जामीन मंजूर होऊ देणार नाहीत व त्याला अटक करतील, असे सांगितले.

त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी सापळा लावून ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, सापळा पथक पोलिस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, दशरथ लाड यांनी पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, हारुण शेख यांच्या मदतीने कारवाई केली.

Breaking News: Teacher caught red-handed while accepting a bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here