Home अहमदनगर अहमदनगर: शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News: शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Teacher commits suicide by hanging

कर्जत:  कर्जत शहरातील शहाजीनगर येथे राहणार्‍या शिक्षकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.  गुरूवारी (दि. 31) पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  नितीन बापूराव होळकर (45) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  होळकर हे कर्जत येथे आई व दोन लहान मुलांच्या समवेत राहत होते. काही महिन्यांपासून त्यांची पत्नी त्यांच्या समवेत राहत नसल्याची माहिती मिळत आहे. राहत्या घराच्या किचनमध्ये गुरुवारी पहाटेच्या वेळी साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. कुटुंबियांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगीतले. होळकर यांची भावजय रुपाली सचिन होळकर यांनी कर्जत पोलिसांना फिर्याद दिली. या प्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल उद्धव दिंडे हे पुढील तपास करत आहेत. आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Teacher commits suicide by hanging

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here