Home संगमनेर बदलापूरनंतर संगमनेरमध्ये शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत…..

बदलापूरनंतर संगमनेरमध्ये शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत…..

Breaking News | Sangamner: तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना.

teacher molesting as many as five girls studying in the third class

अहमदनगर:  शाळेच्या मधल्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी येते आणि तिच्या शिक्षकांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे आपल्या घरच्यांना सांगते. यामुळे घरच्यांना जबर धक्का बसतो. यानंतर आणखी 4 मुलीदेखील आपल्या घरी त्याच शिक्षकाविरोधात अशीच तक्रार करतात. यानंतर या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बदलापूरच्या शाळेत अक्षय शिंदेने अल्पवयीन मुलींचे शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. काही दिवसांपुर्वी पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला. आता घटनेच्या काही दिवसांतच अहिल्यानगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेत शाळेच्या शिक्षकाचीच विद्यार्थीनींवर वाईट नजर असल्याचे दिसून आले आहे. या पीडित मुली इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहेत. त्यामुळे या शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतही अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी असभ्य वर्तन केल्याने शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली आणी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हे समोर आलं आहे. पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: teacher molesting as many as five girls studying in the third class

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here