Home क्राईम खळबळजनक: शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करून पेट्रोल ओतून जिवंत जाळले

खळबळजनक: शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करून पेट्रोल ओतून जिवंत जाळले

Crime News: शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करत पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आल्याची घटना.

teacher was beaten with an iron rod and doused with petrol and burnt alive

वाशिम : शाळेवर जात असताना शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करत पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.  आज सकाळी मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीने शाळेत जात असताना कोल्ही बोर्डी रस्त्यावर अज्ञात आरोपींनी अडवून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. त्यानंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, बराच वेळ ते गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून दोन पथकांचे गठण करण्यात आले आहे.

Web Title: teacher was beaten with an iron rod and doused with petrol and burnt alive

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here