Home अकोले शिक्षकाला अकोलेत दारू विकताना पकडले, माझ्यावर कारवाई करू नका नाही तर मी...

शिक्षकाला अकोलेत दारू विकताना पकडले, माझ्यावर कारवाई करू नका नाही तर मी आत्महत्या करीन

Teacher was caught selling liquor in Akole

अकोले | Akole: तालुक्यातील भंडारदरा जवळील मुरशेत येथील एका टेंटवर हाउस मध्ये दारूसह चार चाकी जप्त करण्यात आली आहे. राजूर पोलिसांनी तेथे धाड टाकून ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भंडारदरा येथे २०२० वर्षाला निरोप देण्यसाठी व नववर्ष स्वागतासाठी पर्यटक आले होते. या पर्यटकांवर राजूर पोलिसांची नजर होती. रात्री पोलीस पेट्रोलिंग करीत असताना भंडारदरा पासून जवळच मुरशेत येथील टेंट पासून जात होती. तेव्हा पर्यटकांना दारूची विक्री अव्वाच्या सव्वा भावात केली जात होती.

राजूर पोलिसांच्या हि बाब लक्षात आल्याने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तत्काळ कारवाई करत दारूचे बॉक्स व चार चाकी ताब्यात घेतली. यावेळी टेंट मालकाने विशेष म्हणजे हा शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारा “तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली तार मी आत्महत्या करीन” अशी धमकी पोलिसांना दिली.

याप्रकरणी राजूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उप निरीक्षक नितीन खैरनार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अस्वले हे इगतपुरी तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्यावर कारवाई केली तर आत्महत्या करून तुमचे नाव घेईल असा दम देण्यात आला. मात्र पोलीस कारवाईपासून मागे हटले नाही.  

Web Title: Teacher was caught selling liquor in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here