धक्कादायक! शिक्षिका पत्नीने पतीला जिवंत जाळलं, लेकीच्या मित्रांनी केली मदत
Kalyan Crime: एका महिलेने पतीला जिवंत जाळल्याची (burned) धक्कादायक घटना समोर आली.
कल्याण : कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात एका महिलेने पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने आपल्या मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने ज्वलनशील पदार्थ टाकून पतीला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये या महिलेच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद्र पवार असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. पतीच्या हत्येप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी अश्विनी पवार हिला अटक केली. विशेष म्हणजे, ही महिला कल्याण पूर्व येथील एका शाळेत मुख्याध्यापिका आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजयनगर परिसरातील विशाल नगरी कॉम्प्लेक्समध्ये हरिश्चंद्र पवार हे पत्नी अश्विनी व दोन मुलींसह राहत होते. ते निवृत्तीनंतर खासगी सुरक्षारक्षकाची नोकरी करत होते. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान मुलगी घरीच असते. या पती-पत्नीत नेहमी वाद होत.
शुक्रवारी रात्रीदेखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी हरिश्चंद्र यांच्या मुलीचे दोन मित्रदेखील घरात होते. संतापाच्या भरात अश्विनी यांनी हरिश्चंद्र यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि पेटती काडी टाकली. यामध्ये ते कमालीचे भाजले. मात्र त्यांच्या घरालाही आग लागली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायकघटनेने खळबळ उडाली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी अश्विनी पवार हिला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
Web Title: Teacher’s wife burned her husband alive, helped by the girl’s friends
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App