संगमनेर: टेम्पोचालकाला भररस्त्यात मारहाण करून लुटले
Breaking News | Sangamner Crime: रोडवरून संगमनेरकडे येणाऱ्या आयशर टेम्पोवर काही अज्ञात चोरट्यांनी दगडफेक केली. यावेळी चोरट्यांनी टेम्पो चालकाकडून चार हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना.
संगमनेर: शहरा लगत असलेल्या कासारा दुमाला शिवारात सर्विस रोडवरून संगमनेरकडे येणाऱ्या आयशर टेम्पोवर काही अज्ञात चोरट्यांनी दगडफेक केली. यावेळी चोरट्यांनी टेम्पो चालकाकडून चार हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
संगमनेर शहराजवळून पुणे नाशिक राष्ट्रीय बायपास महामार्गावर अकोले रोडवरील मालपाणी इस्टेट जवळून संगमनेरकडे वाहनाना जाण्यासाठी सर्विस रोड आहे. या रस्त्याने मध्यरात्रीच्यावेळी अनेक मालवाहतूक वाहने जा-ये करत असतात. संगमनेर शहरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या दीपक सुधाकर चव्हाण हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. एम एच १४ बी जे २५६४) रविवारी पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येत असताना अज्ञात लुटारुंनी त्या आयशर टेम्पोच्या काचेवर दगड फेकला. यावेळी टेम्पो चालकाने वाहनाचा वेग कमी केला. त्याच वेळेस त्या टेम्पो चालकाला लुटण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वाहनचालकाला खाली ओढून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच वाहन चालकाचा मोबाईल काढून घेऊन तो फोडण्यात आला. तर इतर साथीदारांनी गाडीच्या केबिनमध्ये चढून गाडीतील ४ हजार रुपये रुपये हिसकावून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: tempo driver was beaten up and robbed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study