Home Crime News पत्त्याचा कॅट आणायच्या बहाण्याने नराधमाचा दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

पत्त्याचा कॅट आणायच्या बहाण्याने नराधमाचा दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

Pune Rape

Pune Rape : पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात एका दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी एका ३५ वर्षीय इसमाला दुकानातून पत्त्याचा कॅट घेऊन तो द्यायला त्याच्या घरी आली होती. मात्र नियत फिरलेल्या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला घरात घेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब उघड होताच पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर ३५ वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार काल मंगळवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेबारा ते दुपारी दीड या वेळेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच भागात राहतात. आरोपीने सकाळी साधारण पावणेबाराच्या सुमारास पीडित मुलीला घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याने तिला जवळच्या दुकानातून पत्त्याचा कॅट आणण्यास सांगितले होते. त्यानुसार मुलीने सांगितलेले काम ऐकून दुकानातून पत्त्याचा कॅट आणला. तो देण्यासाठी ती पुन्हा आरोपीच्या घराकडे गेली.

आरोपीला कॅट देत असताना आरोपीची नियत फिरली आणि त्याने तिला धरून आपल्या घरात ओढून घेतले. त्यानंतर जबरदस्ती करीत त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट पीडित मुलीने आपल्या घरी सांगितली. मुलीच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार कळल्यावर त्यांनी मदतीसाठी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबियांच्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंदवला असून कोंढवा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : Ten year old girl raped in Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here