Home Maharashtra News Leopard in City : नागरी वसाहतीत घुसून बिबट्याचा सात तास थैमान

Leopard in City : नागरी वसाहतीत घुसून बिबट्याचा सात तास थैमान

Leopard in City

Leopard in City : नाशिकमध्ये आज बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास दहशत माजवली. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. शेवटी वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडलं आहे. हा बिबट्या सकाळी ७ वाजता जय भवानी रोडवर पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचा नागरी वसाहतीत वावर होता. अखेर गायकवाड निवास येथे एका कारखाली लपलेला असताना वनविभागाने त्याला बेशुद्ध करत पकडलं आहे.

नाशिकमध्ये सकाळी ७ वाजता एक बिबट्या जय भवानी रोड परिसरात दिसला. आधी एका इमारतीत दिसलेला हा बिबट्या नंतर एका गार्डनमध्ये आणि काही इमारतींच्या समोरही पाहायला मिळाला. यानंतर बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला, पण बिबट्या न सापडल्याने तो शेजारी असलेल्या जंगलात गेल्याचं बोललं गेलं. मात्र, काही वेळातच हा बिबट्या पुन्हा नागरी वसाहतीत दिसला. यावेळी त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं जात आहे.

तब्बल ७ तास लपंडाव खेळल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला एका कारखाली पकडलं. बिबट्या पळून जाऊ नये म्हणून वनविभागाने संपूर्ण कारभोवती जाळं पसरलं होतं. त्यानंतर बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं. दरम्यान, वनविभाग बिबट्याला पकडत असताना काही उत्साही नागरिकांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोकांच्या सेल्फी किंवा फोटो काढण्याच्या अट्टाहासामुळे वनविभागाला बिबट्याला पकडताना अडथळे आले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून अशा उत्साही नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवावं लागलं. आणि त्यानंतर बिबट्या जाळ्यात अडकला.

Web Title : Terror of leopards in urban settlements in Nashik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here