Home Uncategorized विधानसभेत ठाकरे-फडणवीस यांचा एकत्र प्रवास

विधानसभेत ठाकरे-फडणवीस यांचा एकत्र प्रवास

Breaking News | Thackeray and Phadavanis: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी योगायोगाने विधान भवनात एकाच लिफ्टमधून काही सेकंद प्रवास.

Thackeray-Fadnavis travel together in the Legislative Assembly

मुंबईः २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून घट्ट मैत्री तुटून एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी योगायोगाने विधान भवनात एकाच लिफ्टमधून काही सेकंद प्रवास केला. यावरून ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. मात्र, या लिफ्ट प्रवासाची चांगलीच खमंग चर्चा दिवसभर रंगली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. विधान परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी तळमजल्यावरील लिफ्टच्या प्रतीक्षेत ठाकरे असताना, उपमुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी आले. विधानसभेच्या सभागृहासमोरील व्हरांड्यात (पॅसेज) दोघांची भेट झाली. दोघेही लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर निघून गेले. काही मिनिटांच्या या भेटीत दोघांत काही चर्चा झाली असेल का, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मिश्कील टोला आणि हस्तांदोलन

ठाकरे आणि फडणवीस हे विधानभवनातील लिफ्टमध्ये जाताना गर्दी होती. मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रवीण दरेकर आदी मंडळी लिफ्टमध्ये होती. फडणवीस यांनी काहींना लिफ्टमधून बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान, ठाकरेंनी यांना पहिले बाहेर काढा, असा मिश्कील टोला दरेकर यांना लगावला. तसेच लिफ्टमध्ये प्रवेश करताच दरेकर यांच्याशी हस्तांदोलन केले. विधानभवनात यावेळी खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले.

Web Title: Thackeray-Fadnavis travel together in the Legislative Assembly

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here