Home Maharashtra News ब्रेकिंग: ठाकरे सरकारचा दुकानांबाबत मोठा निर्णय

ब्रेकिंग: ठाकरे सरकारचा दुकानांबाबत मोठा निर्णय

Thackeray government's big decision regarding shops

मुंबई: मंत्रिमंडळाने आज दुकानांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या कार्यालय आणि दुकाने यांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील तसेच मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही अशीही सुधारणा करण्यात आली आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने या नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

Web Title: Thackeray government’s big decision regarding shops

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here