विखे पाटलांच्या मतदारसंघात ठाकरे गट आक्रमक, शिवसैनिकांनी नगर मनमाड महामार्ग अडवला
Ahmednagar News: कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाच्या दरवाढीसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक.
कोल्हार: राज्यात सध्या कांदा निर्यातबंदीवरुन शेतकरी आक्रमक झालेत. एकीकडे अवकाळी पावसाने तोंडचा घास पळविला असतानाच सरकारकडून कांदा निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे गटाने आंदोलन केले.
कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाच्या दरवाढीसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज (शुक्रवार, १५ डिसेंबर) महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केला.
जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी कोल्हार गावातील नगर- मनमाड महाार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीही झाली.
Web Title: Thackeray group aggressive in Vikhe Patal’s constituency
(आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App