अहिल्यानगर: तीन माजी नगरसेवकांसह पाच जणांचा शिंदे सेनेत प्रवेश ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
Breaking News | Ahilyanagar Election. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाचे शहरातील तीन माजी नगरसेवक, दोन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
अहिल्यानगर: आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर व तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाचे शहरातील तीन माजी नगरसेवक, दोन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह दोन पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासह नगर तालुक्यातील इतरांचा प्रवेश रविवारी ठाणे येथे होणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील विधानसभा मतदारसंघाची हक्काची जागा सोडल्याने ठाकरे गटाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सुमारे १२ ते १५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यातील प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव व दीपक खैरे या तिघांसह शोभना चव्हाण, दिलीप सातपुते यांनीही जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला. तसेच नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट, सुशील कदम यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी काल चर्चा केली. रविवारी ते व तालुक्यातील इतर सदस्य, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Thackeray group’s entry of five people including three former corporators into Shinde Sena
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News