Home Maharashtra News उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली बाईक, हवेत उडून दोन तरुण खाली कोसळले, जागीच मृत्यू

उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली बाईक, हवेत उडून दोन तरुण खाली कोसळले, जागीच मृत्यू

Thane Accident: चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीचा अपघात, उड्डाणपुलावरून खाली पडून ठाण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.

Thane Accident bike hit the wall of the flyover, flew in the air and fell down, two youths died

ठाणे: उड्डाणपुलावरून खाली पडून ठाण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील कासकॅसलमिल नाका येथील उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण कठड्याला दुचाकी धडकून हे दोघे तरुण खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मंगळवार २४ जानेवारी पहाटे साडे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रतीक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) असे मयत (Death) झालेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना अपघात होऊन दोन बाईकस्वार खाली पडले आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. (MH 04 LK 4220) असा अपघात झालेल्या दुचाकीचा नंबर असून ही दुचाकी सारिका मोरे यांच्या नावावर रजिस्टर आहे. प्रतीक मोरे हा ठाण्यातील रहिवाशी असून त्याचा साथीदार राजेश हा उल्हासनगरचा रहिवाशी होता. दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली आणि त्यानंतर दुचाकीवरील दोघे तरुण उड्डाणपुलावरुन खाली पडल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

या अपघाताची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णवाहिकेतून या दोघांना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही व्यक्तीना मयत घोषित केले आहे. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हे दोघे तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचे समोर आले असून या प्रकरणाचा अधिकतपास राबोडी पोलीस करत आहे.

Web  Title: Thane Accident bike hit the wall of the flyover, flew in the air and fell down, two youths died

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here