मुंबई : महाराष्ट्रा सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत किराणा दुकानात वाईन (Wine in Grocery Market) विक्रीला परवानगी देत याबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आता राज्यातील मोठ्या किराणा दुकानात वाईन मिळणार आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असं राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही या निर्णयाचं समर्थन करत यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं वक्तव्य केलं आहे.
यासंदर्भात संजय राऊत म्हणाले की, कोण काय करतात ते मला माहित नाही, वाईन हे शेतकरी पिकवत असलेल्या फळांपासून बनणारे एक उत्पादन आहे. वाईनला मद्याचा दर्जा आहे का, हे मला माहीत नाही. जर असेल तर देशामध्ये दारू बंदी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच मी कोणाला समर्थन करत नाही, मात्र राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला सवलत दिली आहे त्याला काही राजकीय पक्ष विरोध करत आहे, ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे.
पुढे ते म्हणाले की, एक्पोर्ट उत्पादन वाढले तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. म्हणजेच द्राक्ष, चिकू, पेरू, सोप असे अनेक धान्य उत्पादनातून वाईन बनवली जाते आणि त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकतो, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखीन सुधारू शकते. शेतकऱ्यांच्या हिताचे संबंध असूनही काही राजकीय पक्ष आता ह्या क्षणी टीका-टिपण्णी करत आहेत. त्यांनी थोडंसं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित समजून घ्यावं. नाहीतर हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात उभे आहात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Web Title : The arrival of wine in grocery stores will improve the economic condition of farmers – claims Sanjay Raut