विरार Mumbai Crime : शहराच्या पश्चिम भागातील भाजी मार्केट परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून भावाने स्वतःच्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. 13 जानेवारी रोजी माया निवास या ठिकाणी हि घडली आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हि संपूर्ण घटना कैद झाली आहे. याप्रकरणी विरार (Virar Police) पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
राजू माया असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव असून तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात राहतो. राजू माया याचे मागील काही दिवसांपासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरु होते. घराच्या भिंतीवरून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिण स्मिता शहा हिच्यावर घरात घुसून कोयत्याने वार करत तिला जखमी केले. दरम्यान हि संपूर्ण थरारक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी राजू माया कोयता घेऊन आपल्या बहिणीच्या घरात शिरताना दिसत आहे. आरोपी राजू हल्ला करून बाहेर आल्यानंतर जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून रुग्णालयात घेऊन जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. जखमी स्मिता शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच विरार पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी राजू माया याला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.
Web title : The brother stabbed his sister with a scythe for a small reason