दिवाळीच्या दिवशीच छोट्या भावाकडून मोठ्या भावाचा खून, आरोपी पसार
Murder News: पैशाच्या वादावादीतून धक्कादायक घटना, धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना.
सांगली: जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादावादीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना रविवार दिवाळीदिनीच घडली. त्यामध्ये महेश राजेंद्र मोरे (वय २७) याचा जागेवरच मृत्यू झाला. तर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे, मुळगावं हालोंडी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) सध्या रा. कापरी (ता. शिराळा ) हे आईसह लहानपनापासून आजोळी मामा व आजीकडे कापरी ता.शिराळा येथे रहात होते. तर वडिल गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. मयत महेश व अविनाश दोघांच्या मध्ये पैसे देव घेवी वरून वारंवार भांडणे होत होती. तर दोघे ही सेटिंगवर कामावर जात होते.
मयत महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे काढत असे याच कारणावरून रविवार दिनांक १२ रोजी रात्री अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण लागले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले, यामध्ये मयत महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: On the day of Diwali, the elder brother was killed by the younger brother.
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App