Home Maharashtra News ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवर पसरली शोककळा

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवर पसरली शोककळा

Kirti Shiledar

पुणे : संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून ६० वर्षे अविरतपणे रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचं वयाच्या ७०व्या वर्षी आज सकाळी दुःखद निधन झालं. अस्वस्थ वाटू लागल्याने सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. मागील ६० वर्षांत आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य असं योगदान दिले. संगीत रंगभूमी पुन्हा नव्या जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करीत असत. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Web Title : The death of veteran singer Kirti Shiledar spread mourning in the music theater

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here