Home क्रीडा IPL 2022 : ‘या’ कारणामुळे यंदाचा हंगामासाठी महाराष्ट्राची होऊ शकते निवड

IPL 2022 : ‘या’ कारणामुळे यंदाचा हंगामासाठी महाराष्ट्राची होऊ शकते निवड

season of IPL 2022 will be held in Mumbai

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कोरोनाचं सावट असलं तरी यंदा IPL 2022 चा हंगाम हा भारतात होणार आहे. BCCI चे सचिव जय शहा यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सामने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत खेळवण्यात येतील. यंदा 10 टीम आणि 72 सामने असणार आहेत. याशिवाय वाढत्या कोरोनामुळे भारतात IPL होऊ शकलं नाही तर दक्षिण आफ्रिका हा बॅक अप प्लॅन तयार असल्याची माहिती दिली आहे. मात्र जर आयपीएल भारतात होत असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचा विचार केला जाऊ शकतो.

यंदाचे सामने भारतात होणार असल्याची माहिती देखील जय शहा यांनी दिली आहे. हे सामने महाराष्ट्रात खेळवले जाण्याची शक्यता जास्त आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 4 स्टेडियममध्ये 15 व्या मोसमातील सामने पार पडतील.

मागील वर्षीच्या आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील 31 सामने युएई मधील तीन मैदानात खेळवले होते. मात्र यंदाची आयपीएल भारतात खेळण्याचा मानस आहे. महाराष्ट्रातील मुंबई शहरातच ठराविक अंतरावर तीन मोठे क्रिकेट स्टेडियम आहेत. त्यामुळे या तीन मैदानात सामने झाले तर खेळाडूंना देखील लांबचा व विमान प्रवास न करता संपूर्ण हंगाम एकाच शहरात खेळता येईल.

महाराष्ट्राच्या निवडीची तांत्रिक कारणे

महाराष्ट्रातील मुंबईत 2, नवी मुंबईत 1, पुण्यात 1 आणि नागपूर येथे 1 असे एकूण 5 प्रशस्त क्रिकेट स्टेडियम आहेत. मात्र नागपूर हे मुंबई पासून दूर आहे. त्यामुळे हे सर्व सामने मुंबईतील वानखेडे, बेब्रोन स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवले जातील. तसेच जर गरज पडली तर पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

यावेळेसही 15 व्या मोसमातील सर्व सामने हे क्रिकेट चाहत्यांशिवायच म्हणजेच बंद दाराआड खेळवण्यात येणार असल्याचंही ठरलं आहे. कोरोनाचा संसर्ग आणि धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title : The entire season of IPL 2022 will be held in Mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here