Home Maharashtra News नाना पटोलेंनी सांगितलेला बहुचर्चित गावगुंड मोदी अखेर आला समोर

नाना पटोलेंनी सांगितलेला बहुचर्चित गावगुंड मोदी अखेर आला समोर

Nana Patole Modi

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ज्या तथाकथित मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी अखेर समोर आला आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं होतं. असं असलं तरीही, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मात्र हा मोदीला चांगलाच बिथरला होता.

भंडारा जिल्ह्याच्या गोंदीया गावातील हा गावगुंड म्हणून ओळखला जाणारा तथाकथित मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द वापरले तसेच त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ऍड. सतीश उके यांनी केला आहे. या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे असं असून अनेक लोक त्याच्या मागे लागले होते. त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं.

तथाकथित मोदी मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना चांगलाच मेटाकुटीला आला होता. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या व त्यांच्या विरोधात प्रचार केला, असं सांगत 2020 पासून मोदी असं टोपण नाव आपल्याला पडल्याचं त्याने सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे मात्र सांगण्यास त्याने नकार दिला. पत्रकारांच्या वाढत जाणाऱ्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीनं तिथून काढता पाय घेतला. त्यामुळं खरोखरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच व्यक्ती होता, की तो हाच आहे असा दर्शविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Web Title : The gangster Modi mentioned by Nana Patole came in front

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here