Home Maharashtra News गरीब कुटुंबात लग्न झालं म्हणून मुलीने केली आत्महत्या

गरीब कुटुंबात लग्न झालं म्हणून मुलीने केली आत्महत्या

Nagpur Suicide

Nagpur Suicide : कुटुंबियांनी गरीब घरात लग्न लावून दिलं म्हणून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जलालखेडा येथील अश्विनी रणमले (25) या नवविवाहित महिलेने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांना अश्विनीची रोजनिशी हाताला लागली. ज्यावरून नैराश्येत येऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांना आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील हरिदास रणमले याच्याशी अश्विनीचा विवाह डिसेंबर मध्ये झाला होता. लग्नाच्या वर्षभरा आधी जिल्हा परिषद शाळेत त्याला नोकरी लागली होती. मात्र पहिली तीन वर्षे शिक्षणसेवक असल्याने त्याला सहा हजार इतकेच मानधन दिले जात होते. मागील एक वर्षापासून दोघे दांपत्य जलालखेडा येथे भाड्याने राहत होते. मात्र मंगळवारी दुपारी पती कामावर निघून गेल्यानंतर अश्विनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अश्विनीचे वडील हे वनविभागात होते आणि तिच्या माहेरची परिस्थिती सासर पेक्षा चांगली होती. पोलिसांनी शोधाशोध केली असता तिची रोजनिशी पोलिसांच्या हाती लागली. माझ्या सर्व मैत्रिणी गरीब होत्या पण त्यांना चांगली सासरवाडी मिळाली. आणि मला मात्र गरीब घरी दिली. साक्षगंध झालेला दिवस माझ्यासाठी काळा दिवस होता. माझा परिवार उच्चशिक्षित असून माझे लग्न गरीब घरात झाल्याचे तिने त्यात लिहले आहे. या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आश्विनीने याच नैराश्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

Web Title : The girl committed suicide after getting married in a poor family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here