Home संपादकीय व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक व प्रशंसापत्र

व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक व प्रशंसापत्र

Somnath Gite Sangamner: डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. 

Governor Dr. Appreciation and letter of appreciation for the work of Somnath Gite

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी डॉ. सोमनाथ गिते यांनी त्यांची भेट घेतली आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा केली. राज्यपालांनी डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याचे कौतुक केले व प्रशंसापत्र दिले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य आवश्यक असून हे कार्य असेच सुरु ठेवा, व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमच्या कार्याचा नक्की फायदा होईल, असेही म्हणाले. काहीही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

डॉ. सोमनाथ गिते यांनी मागील काही काळापासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले असून यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी गिते यांना पत्र पाठवत त्यांच्या कार्याची दखल घेतली होती, त्यानंतर आज झालेल्या भेटीत यावर विस्तृत चर्चा झाली. राज्यपालांनी यावेळी कौतुकाची थाप देत समाजासाठी चांगले काम करत असल्याचे म्हटले.

डॉ. सोमनाथ गिते यांच्या याच कामाचे कौतुक करत राज्यपालांनी प्रशंसापत्रात म्हटले आहे कि, समाजामध्ये व्यसनाचे भीषण परिणाम दिसत आहेत. व्यसनाचे दुष्परिणाम एकट्या व्यक्तीला नाही तर, संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. व्यसनी व्यक्तीच्या समुपदेशनाबरोबरच शाळा, महाविद्यालयांत जाऊन व्यसनमुक्तीबदल जनजागृती करतात. मी त्याच्या या समर्पित कार्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश मिळावे अशा शुभेच्छा देतो.

डॉ. सोमनाथ गिते म्हणाले कि, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माझ्या कामाचे कौतुक करून मला प्रशंसापत्र दिले, हे माझ्यासाठी तसेच माझ्यासारख्या अनेक व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचे आहे. आज माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर व्यसनमुक्ती या विषयावर विस्तृत चर्चा झाली, तसेच त्यांना कामाचा अहवाल सादर केला. मला पुरस्कार मिळाल्याबद्ल त्यांनी माझे अभिनंदन केले. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यामुळे व्यसनमुक्तीचे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळाले.

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून मला डॉक्टरेट पदवी देऊन गौरिवण्यात आले आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, आमदार मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

गिते यांना मिळालेले पुरस्कार :

व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन)

राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२ (व्यसनमुक्ती परिषद)

राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार २०२२

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्कार २०२2

डॉक्टरेट पदवी (DOCTORATE IN DE-ADDICTION STUDY AND INNOVATION)

Web Title: the Governor Dr. Appreciation and letter of appreciation for the work of Somnath Gite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here