Home क्रीडा BBL Final : 25/4 अशी परिस्थिती; संपूर्ण स्पर्धेत शांत असणाऱ्या खेळाडूने जिंकून...

BBL Final : 25/4 अशी परिस्थिती; संपूर्ण स्पर्धेत शांत असणाऱ्या खेळाडूने जिंकून दिली फायनल

BBL Final

BBL Final (Santosh Diwadkar) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ‘बिग बॅश लीग’ (Big Bash League) स्पर्धेचा अंतिम सामना आज ‘पर्थ स्कॉचर्स’ विरुद्ध ‘सिडनी सिक्सर’ या संघात झाला. सुरुवातीला हा सामना सिक्सरच्या बाजूने झुकला होता मात्र या सामन्याच्या शेवटी स्कॉचर्स संघाने जेतेपद पटकावले.

नाणेफेक जिंकून गतविजेता संघ सिक्सर्सने गोलंदाजी स्वीकारली. जास्तीत जास्त धावा उभ्या करण्याच्या नादात स्कॉचर्स संघाने आपले चारही दिग्गज फलंदाज एकाच वेळी गमावून टाकले. संघाच्या फलंदाजीचे चार स्तंभ मानले जाणारे करटीस पेटरसन, जोश इंग्लिस, कर्णधार मिचेल मार्श आणि कॉलिन मनरो सुरुवातीलाच बाद झाले. सहा ओव्हर्स नंतर स्कॉचर्स संघाची धावसंख्या 4 बाद 25 धावा अशी होती. मात्र या नंतर एष्टोन टर्नर आणि लॉरी एवन्स यांनी डाव सावरला आणि 104 धावांची बहुमूल्य भागीदारी करीत संघाला पुन्हा सामन्यात आणले.

चौथ्या विकेट नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला लॉरी एव्हन्स हा संपूर्ण स्पर्धेत शांत दिसला होता. मात्र संघ अडचणीत असताना अंतिम सामन्याच्या दबावात 41 चेंडूत 76 धावा ठोकल्या. तर टर्नरने देखील 54 धावा केल्या. या दोघांच्या जोरावर स्कॉचर्सने सिक्सर समोर 172 धावांचे तगडे आव्हान उभे केले. यात सिक्सर्स कडून नेथन लायन आणि स्टीव्ह ओ किफ ने प्रत्येकी 2-2 बळी टिपले.

जेतेपदाची हेट्रिक बनविण्याचा प्रेशर सिडनी सिक्सर्सचा संघ झेलू शकला नाही. एकामागोमाग एक विकेट फेकत अवघ्या 92 धावांवर सिक्सर्सचा संघ गारद झाला. संघातील डेनीयल ह्युजला फक्त 42 धावा करता आल्या. तर स्कॉचर्स कडून जाय रिचर्डसनने 2 तर अँड्र्यू टायने सर्वाधिक 3 गडी बाद केले. आणि अंतिम सामना 79 धावांनी पर्थ स्कॉचर्स संघाने आपल्या नावावर केला.

Web Title : The Perth Schochers beat the Sydney Sixers in the final

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here