Home अहमदनगर अहिल्याबाई: या घाटात तांदळाचा ट्रक शंभर फुट दरीत कोसळला

अहिल्याबाई: या घाटात तांदळाचा ट्रक शंभर फुट दरीत कोसळला

Breaking News | Ahmednagar: कर्नाटक राज्यातून बारामती येथे तीस टन तांदूळ घेऊन चाललेला चौदा चाकी ट्रक साकत घाटात (ता. जामखेड) वळणावर चालकाला अंदाज न आल्याने शंभर फूट खोल दरीत कोसळला.

the rice truck fell into a hundred feet valley

जामखेड : कर्नाटक राज्यातून बारामती येथे तीस टन तांदूळ घेऊन चाललेला चौदा चाकी ट्रक साकत घाटात (ता. जामखेड) वळणावर चालकाला अंदाज न आल्याने शंभर फूट खोल दरीत कोसळला. प्रसंगावधान राखून चालक-वाहकाने बाहेर उडी मारल्याने ते बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. ११) रात्री आठच्या सुमारास घडली. जामखेड येथील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

येथील अपघात सत्र सुरूच आहे. धुळे-नंदूरबार येथील प्रभाकर पाटील यांच्या मालकीचा हा ट्रक आहे. हा ट्रक कर्नाटकहून बारामती येथे बिअर बनविण्यासाठी लागणारा तांदूळ घेऊन चालला होता. या ट्रकमध्ये तीस टन तांदूळ होता. पिवळसर व काही पांढऱ्या रंगाचा तांदूळ रेशनवरील आहे की काय, अशी शंका काही ग्रामस्थांनी उपस्थित केली. तालुक्यातील साकतचा घाट खूपच अरुंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही. यातून नेहमीच अपघात होतात. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास साकत घाटातच वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक घाटात खोल दरीत कोसळला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले. एका वर्षात साकत घाटात दहा ते बारा अपघात झाले आहेत. यात  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे तत्काळ घाटाचे रुंदीकरण करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: the rice truck fell into a hundred feet valley

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here