प्रॉब्लेम घेऊन आली महिला, भोंदूबाबाने बंद खोलीत नेलं अन… भोंदूबाबाचे धक्कादायक कृत्य
Kalyan Crime: भोंदू बाबाचे संतापजनक कृत्य आले समोर, अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार.
कल्याण : कल्याण जवळील आंबिवली मोहने परिसरात भोंदू बाबाचे संतापजनक कृत्य आले समोर आहे. घरातील अडचणी सोडवण्याकरता एक महिला या भोंदू बाबाकडे गेली होती, त्यावेळी अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या भोंदू बाबाचे नाव अरविंद जाधव (50) असे आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप भोंदू बाबाला अटक केली नसल्याने पीडित महिलेने संताप व्यक्त केला आहे.
ही पीडित महिला भोंदू बाबाकडे घरातील समस्या घेऊन नातेवाईकासह गेली होती. तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस, काहीही टेन्शन घेऊ नकोस, तुझी सगळी टेन्शन मी दूर करतो, असं त्याने महिलेला सांगितलं. त्यानंतर भोंदू बाबाने महिलेसोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबायला सांगितलं. यानंतर बाबाने महिलेसोबत अश्लिल चाळे करायला सुरूवात केली. यानंतर महिलेने विरोध केला असता, कुटुंबाचं बरं वाईट केलं जाईल अशी धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली आहे.
पीडित महिलेने याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच तिच्यासह अन्य कोणत्या महिले अथवा मुली बाबत असा कोणता प्रकार घडला आहे का? याबाबत अधिक तपास सुरु आहे.
Web Title: The woman came with the problem, Bhondubaba took her to a closed room
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News