Home अहमदनगर महिला पोलिसाची चेन चोरली; अन घडले असे की….

महिला पोलिसाची चेन चोरली; अन घडले असे की….

Breaking News | Ahmednagar: महिला पोलिसाने पाठलाग करत चोरट्यांना पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली आणि चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन.

The woman stole the policeman's chain

अहमदनगर : किराणा घेऊन जात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला पोलिसाने पाठलाग करत चोरट्यांना पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली आणि चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला पोलिसाने दाखविलेले धाडस पोलिस दलातील चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. ६) रात्री ७ वाजेच्या सुमारास निलक्रांती चौकात घडली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

विकी भोसले (१९) व आकाश भोसले (१९, दोघे रा. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस कॉन्स्टेबल मोहिनी ज्योतीराम काळे यांची पोलिस मुख्यालयात नियुक्ती आहे. मंगळवारी रात्री कांबळे व आश्विनी थोरात, या दोघी किराणा घेण्यासाठी निलक्रांती चौकातून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून दोघेजण आले. यातील मागे बसलेल्या व्यक्तीने कांबळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून पळ काढला. त्यांनी लागलीच मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला. महिला पोलिसांनी चोरट्याला पकडून त्यांच्याकडील सोन्याची चेन काढून घेतली. त्यावेळी तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमली. काहींनी तात्काळ तोफखाना पोलिसांना फोन करून माहिती दिली. काही वेळातच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक करत आहे.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून चोरट्यांची शोध मोहीम सुरू आहे. परंतु, चोरटे सापडत नव्हते. चोरट्यांनी महिला पोलिसाच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी धाडस दाखवित चोरट्यांचा पाठलाग केला, मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना महिला पोलिसांनी पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. यातून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: The woman stole the policeman’s chain

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here