Home Maharashtra News रेल्वे कर्मचाऱ्याची ‘लौकिक’ कामगिरी; सापडलेला नवा लॅपटॉप डिलिव्हरी बॉयला केला परत

रेल्वे कर्मचाऱ्याची ‘लौकिक’ कामगिरी; सापडलेला नवा लॅपटॉप डिलिव्हरी बॉयला केला परत

Honest railway employee

मुंबई (संतोष दिवाडकर): रेल्वेच्या OHE विभागात टेक्निशियन म्हणून काम करणारा लौकिक आचरेकर (Laukik Achrekar) याला काल नेरुळ रेल्वे स्थानकावर एक नवा कोरा करकरीत बॉक्स पॅकिंग लॅपटॉप निदर्शनास आला. हा लॅपटॉप कुणाचा आहे? यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले असता कुणीही आढळले नाही. म्हणून त्याने तो लॅपटॉप स्थानक प्रबंधकाकडे (Station Manager) जमा केला.

काही वेळानंतर विसरलेला लॅपटॉप शोधण्यासाठी एक डिलिव्हरी बॉय बैचेन अवस्थेत तिथे आला. यानंतर लॅपटॉपचा बॉक्स पाहून त्या डिलिव्हरी बॉयचा जीव भांड्यात पडला. यानंतर लौकिक स्टेशन मॅनेजर सोबतच 80 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप सदर डिलिव्हरी बॉयला परत केला.

नकळतपणे विसरलेल्या महागड्या पार्सलमुळे डिलिव्हरी बॉय पूर्णपणे तणावाखाली आला होता. मात्र लौकिक आचरेकरच्या प्रामाणिकपणा मुळे संबंधित डिलिव्हरी बॉय वरील मोठे आर्थिक संकट तरले. यामुळे लौकीकच्या इमानदारी बद्दल त्याने त्याचे आभार मानले. यानंतर स्टेशन मॅनेजर कडूनही लौकिकचे कौतुक करण्यात आले. या कामगिरी नंतर लौकिकचा सर्वत्र नावलौकिक होऊ लागला असून त्याच्या इमानदारीमुळे त्याला विश्वासू व्यक्ती म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे.

Web Title : The ‘worldly’ performance of a honest railway employee; Found new laptop delivered back to Boy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here