Home अहमदनगर अहमदनगर: युवकाने बसचालकास केली मारहाण

अहमदनगर: युवकाने बसचालकास केली मारहाण

Ahmednagar News | Karjat:  एसटी बस का थांबवली नाही म्हणत चालकास युवकाने मारहाण केल्याची घटना.

The youth assaulted the bus driver

कर्जत : एसटी बस का थांबवली नाही म्हणत चालकास युवकाने मारहाण केल्याची घटना आंबीजळगाव (ता. कर्जत) येथे घडली. या युवकावर बस चालकाच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी (दि.२५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

याबाबत बसचालक संतोष ज्ञानदेव नेवसे (श्रीगोंदा आगार) यांनी फिर्याद दिली. नेवसे हे एसटी बस खातगावहून कर्जतकडे घेऊन निघाले होते. खातगावच्या पुढे अंदाजे दोन किमी आंबीजळगाव रस्त्याने येत असताना पाठीमागून दुचाकीवर अजिंक्य देवीदास रोठे आला. त्याने एसटी बसला दुचाकी आडवी उभी केली. चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून शिवीगाळ केली. बसचालक संतोष नेवसे यांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. नेवसे यांच्या फिर्यादीवरून अजिंक्य रोठे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: The youth assaulted the bus driver

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here