Home Sangamner News संगमनेर तालुक्यात पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ

संगमनेर तालुक्यात पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ

Theft are rampant in the plateau area of ​​Sangamner taluka

Ahmednagar News | Sangamner Theft | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. शनिवारी पहाटे चोरट्यांनी घारगाव येथील इलेक्ट्रिक दुकान फोडले तसेच वनकुटे गावातील तीन बंद घरे फोडली. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी व ग्रामस्थ संतप्त झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव येथील प्रतिक बाळासाहेब गाडेकर यांचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने दुकानावर चढून वरील पत्रे उचकटून आत प्रवेश करत दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून पोबारा केला आहे.

तसेच वनकुटे येथील साहेबराव आनाजी हांडे, उत्तम रखमा शेळके व संदीप वाकचौरे यांची बंद घरे चोरट्यांनी फोडून सामानाची उचकापाचक केली आहे. या घरांमधून किती ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप समजू शकले नाही.

पठार भागात वारंवार चोऱ्या होत असल्याने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. घारगाव येथील व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आहेर, विकास मते, संग्राम आहेर. तुषार गाडेकर, विनायक गाडेकर, संपत गाडेकर अनिल गाडेकर, शांताराम थोरात या व आदि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे.

Web Title: Theft are rampant in the plateau area of ​​Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here