संगमनेर तालुक्यात घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी
Breaking News | Sangamner Theft: अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून अर्धा तोळे सोने व रोख रक्कम चोरून पोबारा.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून अर्धा तोळे सोने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. खंदरमाळवाडी येथील सुमन पांडुरंग भोजणे (वय ५०) यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि १८ हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे सोन्याचे दागिने रोख रकम ५ हजार रुपये असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला.
या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजू खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली याप्रकरणी सुमन भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पठारभागात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून या चोरट्यांचा शोध लागत नाही. चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरीकांमधून होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Web Title: Theft by breaking the door frame of the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study