Home क्राईम संगमनेर बस स्थानकावर साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रूपये लंपास

संगमनेर बस स्थानकावर साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रूपये लंपास

Sangamner Theft:  संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रूपये लंपास.

Theft Gold ornaments worth three and a half tolas and lampas worth Rs.3,000 at Sangamner

संगमनेर: संगमनेर बस स्थानकावर संगमनेर येथून नाशिककडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. संगमनेर शहरात व तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

प्रियंका संदीप कडलग (रा. अंजनी कॉलनी, संगमनेर) या मंगळवारी सायंकाळी संगमनेर बस स्थानकातून नाशिक कडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना पर्समध्ये ठेवलेल्या छोट्या पाकिटातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने (गंठण, ठुशी) व रोख तीन हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी कडलग यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान शहरातील मोटार सायकल चोरी सातत्याने होत असून मोटरसायकलींची चोरी थांबण्याऐवजी त्यात वाढत झालेली दिसते. घरफोडी आणि दरोड्याचे सत्र झाल्यानंतर आता बस स्थानकावर पाकीटमारी बरोबरच सोन्याच्या दागिन्यांचीही चोरी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बस स्थानकात नुकतीच पोलीस चौकी सुरु करण्यात आली आहे. असे असतानाही चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

Web Title: Theft Gold ornaments worth three and a half tolas and lampas worth Rs.3,000 at Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here